mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अमेरिकेतही ‘श्रीं’ चा महिमा! : The glory of Shri in America too!

शेअर करा :

The glory of Shri in America too! : अमेरिकेतील ऑर्लँडो येथे मुळचे डोणगावचे रहिवासी असलेल्या सावजी परिवाराच्या पुढाकाराने प्रगटदिन सोहळा मोठ्या वातावरणात पार पडला.

The glory of 'Shri' in America too!
अमेरिका येथे संत गजानन महाराजांचे पूजन करताना भाविक व सावजी परिवार

सावजी परिवाराने साजरा केला प्रगटदिन उत्सव

आसिफ शाह
मेहकर : संत गजानन महाराज यांची ख्याती महाराष्ट्र व देशापुरतीच मर्यादित राहिली नसून, अमेरिकेमध्ये देखील भक्तीचा गजर होत आहे. ऑर्लँडो येथे मुळचे डोणगावचे रहिवासी असलेल्या सावजी परिवाराच्या पुढाकाराने प्रगटदिन सोहळा मोठ्या वातावरणात पार पडला.
अमेरिका येथील ऑर्लँडो (Orlando) या ठिकाणी हिंदू सोसायटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडा मंदिरात प्रगटदिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा झाला. उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सागर सावजी व डॉ. नेहा सावजी यांनी अभिषेक व पूजा करून केली. त्यानंतर सामूहिक पारायण, भजन, आरतीचा कार्यक्रम झाला. अमेरिकेसारख्या ठिकाणी शेकडो जणांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन मूळ डोणगाव निवासी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचे बंधू प्रशांत व मीनल सावजी, यांनी केले. महाप्रसाद बनविण्यासाठी प्रामुख्याने नूतन ओक, सुयशा गुळगुळे, सुरभी महाजन, कल्पना कीर्तने, नयना कावळे यांनी मदत केली.

३६ वर्षांपासून जोपासली परंपरा

डोणगाव येथे शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी येते.  सुबोध सावजी हे राज्यमंत्री असताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी पालखी यायची. वारकरी व भाविकांची सावजी परिवार सेवा करायचा. ३६  वर्षांपूर्वी अमेरिकेत वास्तव्यास गेलेल्या प्रशांत सावजी यांनी तेथेही अविरतपणे संत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top