Anil Kute appointed as BJPs Dhad city president : भारतीय जनता पार्टीच्या धाड शहराध्यक्षपदी अनिल कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुलढाणा : भारतीय जनता पार्टीच्या धाड शहराध्यक्षपदी अनिल कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही जबाबदारी सोपवत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी नियुक्तीपत्र कुटे यांना प्रदान केले.
तालुकाध्यक्ष अनिल जाधव यांनी एका पत्रान्वये ही नियुक्ती केली. यावेळी जाधव यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. धाड हे चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे त्यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कुटे हे शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. ते कायम सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यात अग्रेसर राहतात.
पक्ष संघटनेत सातत्याने सक्रिय असलेले कुटे निवडणुकीच्या काळात मतदान नियोजनात मोलाची भूमिका बजावतात. धाड व पंचक्रोशीतील लोक त्यांना आपुलकीचे म्हणून ओळखतात. भाजपच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांतून बहुमताने निवड झालेल्या कुटे हे ताईसाहेबांचे विश्वासू मानले जातात.
आमदार श्वेताताई यांनी या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त करताना म्हटले अनिल कुटे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी दिली आहे. ते धाड शहराच्या विकास आणि पक्ष वाढीसाठी निश्चितच मोलाचे योगदान देतील. या नियुक्तीमुळे धाड शहरातील भाजप संघटन अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षण त्यांनी व्यक्त केली.
आज एक नवीन जबाबदारी
धाड शहर भाजपा अध्यक्ष म्हणून मला मिळालेल्या संधीचे सोने केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. जनता व पक्षासाठी अधिक मेहनत घेऊन काम करेन, अशी ग्वाही कुटे यांनी यावेळी दिली.

