mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

शंतनूच्या आयुष्याची परीक्षा संपली! : The test of Shantanus life is over!

शेअर करा :

The test of Shantanu’s life is over! : बीएससीचे शिक्षण घेणाऱ्या शंतनू अंभोरे या युवकाची आज परीक्षा होती. मात्र पेपर सोडविण्याआधीच काळाने घाला घातल्यामुळे त्याच्या आयुष्याची परीक्षा संपली. ट्रकने धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

The test of Shantanus life is over!

हातणीजवळ अपघातात मृत्यू : बुलढाणा येथे परीक्षेला जाताना दुर्घटना
चिखली : बीएससीचे शिक्षण घेणाऱ्या शंतनू अंभोरे या युवकाची आज परीक्षा होती. मात्र पेपर सोडविण्याआधीच काळाने घाला घातल्यामुळे त्याच्या आयुष्याची परीक्षा संपली. ट्रकने धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. चिखली ते बुलढाणा मार्गावर हातणीजवळ १२ फेब्रुवारीला सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान हा अपघात घडला.
चिखली तालुक्यातील एकलारा येथील  रहिवासी शंतनू नारायण अंभोरे (वय २१) हा या अपघातात ठार झाला आहे. शंतनु मुक्त विद्यापीठामधून बीएससीचे शिक्षण घेत होता. गुरुवारी परीक्षा असल्याने तो एमएच-२८-एजी-५४७१ क्रमांकाच्या दुचाकीने एकलारा येथून बुलढाण्याला निघाला होता. मात्र मध्येच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी कळली आणि कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला. एमएच-१९- झेड-५६८६ या क्रमांकाच्या ट्रकने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अपघात घडताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली. चिखली पोलीसही दाखल झाले.
शंतनुचे चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, तर अंभोरे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top