mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीला घातला हार! : The Deputy Executive Engineer of Mahavitaran was defeated!

शेअर करा :

The Deputy Executive Engineer of Mahavitaran was defeated! : विजेच्या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांची होणारी गैरसोय पाहता युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कार्यालय गाठले. मात्र, अधिकारी गायब असल्याने रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्यात आली.

विजेच्या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांची होणारी गैरसोय पाहता युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कार्यालय गाठले. मात्र, अधिकारी गायब असल्याने रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्यात आली.

युवक काँग्रेसची गांधीगिरी
वाशीम : विजेच्या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांची होणारी गैरसोय पाहता युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कार्यालय गाठले. मात्र, अधिकारी गायब असल्याने रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्यात आली.
वाकद  उपकेंद्रांतर्गत  वाकद, महागाव, बाळखेड, गोहोगाव, वाडी वाकद, एकलासपूर येथील कृषीपंपाचा वीजपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद असल्यामुळे गहू, कांदा, हळद आणि इतर रब्बी पिके वाळत आहेत. उपकार्यकारी अभियंता कार्यालयात हजर राहात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत गांधीगिरी आंदोलन करीत उपकार्यकारी अभियंता राऊत यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.
कृषीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करा, महागाव, बाळखेड येथे कायमस्वरूपी लाइनमनची नेमणूक करावी, दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करावीत, नवीन मंजूर असलेली वाकद उपकेंद्रावरून महागाव  कृषीपंपांची वीज सुरू करावी, धोडप बुद्रुक उपकेंद्रावरून भापूर तांदुळवाडी या नवीन मंजूर  वीज वाहिनीचे काम तत्काळ सुरू करावी, अधिकाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवूत तत्काळ कार्यपद्धतीत सुधारणा करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top