mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

दारूच्या दुकानासमोर महिलांचा ठिय्या : Women sitting in front of a liquor shop

शेअर करा :

Women sitting in front of a liquor shop : रिसोड शहरातील इंदिरानगर भागात देशी दारूच्या दुकानामुळे युवा पिढी बरबादीच्या उंबरठ्यावर टेकली आहे. यापुढे कुणी दारूच्या आहारी जाणार नाही आणि या सर्व गोष्टींना कारणीभूत असलेल्या दुकानदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलांनी ९ फेब्रुवारीला थेट दारूच्या दुकानासमोरच ठिय्या आंदोलन केले.

Women sitting in front of liquor shop

 

रिसोड येथील महिलांचे आंदोलन


शेख अन्सारोद्दीन
रिसोड : शहरातील इंदिरानगर भागात देशी दारूच्या दुकानामुळे युवा पिढी बरबादीच्या उंबरठ्यावर टेकली आहे. यापुढे कुणी दारूच्या आहारी जाणार नाही आणि या सर्व गोष्टींना कारणीभूत असलेल्या दुकानदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलांनी ९ फेब्रुवारीला थेट दारूच्या दुकानासमोरच ठिय्या आंदोलन केले.
तरुणांसोबतच ग्रामस्थ दारूच्या नादाला लाग लागले आहेत. दारूने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. दारूच्या दुकानामुळे महिला व नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
या दारू दुकानामुळे परिसरात सतत गोंधळ निर्माण होऊन भांडणे लागत होती. चौकात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. अखेर महिलांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

आंदोलनादरम्यान महिलांनी दारू दुकान हटवा, आमच्या परिसरात शांतता हवी, अशा घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. या दुकानामुळे मुलांवरही वाईट परिणाम होत असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप केला. या वेळी काही सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर, ठाणेदार रामेश्वर चव्हाण, मुख्याधिकारी सतिश शेवदा, नगराध्यक्ष भागवानदादा क्षिरसागर, नगरसेवक संतोष चऱ्हाटे, नगरसेविका माधुरी इरतकर, पोलीस, महसूल उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चर्चा केली.प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणावर निर्णय घेऊन दारू दुकान हटविण्याची मागणी मान्य करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top