Chhatrapati Shivaji Maharaj Maharaj’s self-satisfaction camp begins with enthusiasm : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उत्साहात सुरुवात.

धाड : – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर १३ फेब्रुवारी २०२६ ढालसावंगी येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या या लोकाभिमुख उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसुली समस्या एकाच ठिकाणी सोडवल्या जाणार आहेत.

शिबिरात फेरफार, नामांतरण, उतारे, विविध दाखले आणि इतर महसुली कामांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कामे हाताळून अनेक प्रलंबित प्रकरणांना मार्गी लावले.
शिबिराला भेट देऊन पाहणी करणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये विष्णू पाटील वाघ यांचा समावेश होता. त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत सरपंच राजू वाघ ढालसावंगी, उपजिल्हाप्रमुख शिवसेना बुलढाणा निलेश पाटील गुजर , मा. सरपंच डीगांबर जाधव धाड, तालुका अध्यक्ष सहकार आघाडी भाजपा बबलू वाघूर्डे , शहराध्यक्ष भाजपा अनिल कुटे धाड, आणि उपसरपंच ढालसावंगी सिद्धेश्वर लडके यांची उपस्थिती लाभली.
हे शिबिर महाराष्ट्र सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत आयोजित केले जाते, ज्यामुळे मंडळ स्तरावर वर्षातून अनेकदा अशा शिबिरांचे आयोजन होऊन सामान्य जनतेला थेट सेवा मिळते. प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. शिबिरामुळे अनेक प्रलंबित महसुली प्रश्न सुटण्यास मदत झाली असून, यामुळे ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी होत असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राबवले जाणारे हे अभियान खरोखरच लोककल्याणासाठी प्रभावी ठरत आहे.

