mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

टोकदार दगडावर आदळून तरुण ठार : Youth killed after hitting sharp stone

शेअर करा :

Youth killed after hitting sharp stone : कोथळी शिवारात १६ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री एक वाजता दुचाकीला अपघात होऊन टोकदार दगडावर डोके आदळल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला.

Youth killed after hitting sharp stone

स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल

मोताळा : कोथळी शिवारात १६ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री एक वाजता दुचाकीला अपघात होऊन टोकदार दगडावर डोके आदळल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. महिनाभरानंतर त्या तरुणाविरुद्ध स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा बोराखडी पोलिसांत दाखल झाला आहे.

अकोला येथील वाशीम बायपास परिसरातील रहिवासी फारुख शाह सलीम शाह (वय ३३) सध्या कोथळी येथे राहतो. १६ जानेवारी रोजी रात्री एक वाजता एमएच-३०-वाययू-७२४६ क्रमांकाचा दुचाकीने तो जात होता. वाहन भरधाव वेगाने चालविल्यामुळे कोथळी ते जयपूर रोडवरील नाल्याजवळील दगडावर धडकला. मोटारसायकलसह पडल्यानंतर त्याचे डोके टोकदार दगडावर आदळले. त्यातच फारूखचा जागीच मृत्यू झाला.

मृत फारूखचा भाऊ जुनेद शाह सलीम शाह याने अंत्यविधी आणि इतर कार्यक्रम आटोपल्यानंतर १३ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी चार वाजता बोराखेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. हवालदार अनिता मोरे यांनी नोंद करून घेतली. घटनेचा तपास पोलीस हवालदार श्रीकांत चिटवार करीत आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top