mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

टिपू सुलतान यांची शिवरायांशी तुलना केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांवर टीका : Congress state president Sapkal criticized for comparing Tipu Sultan with Shivaji

शेअर करा :
Congress state president Sapkal criticized for comparing Tipu Sultan with Shivaji : टिपू सुलतान यांची प्रशंसा करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्यावर टीका करीत जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. 
Congress state president Sapkal criticized for comparing Tipu Sultan with ShivajiCongress state president Sapkal criticized for comparing Tipu Sultan with Shivaji
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त : जाहीर माफी मागण्याची केली मागणी
बुलढाणा : टिपू सुलतान यांची प्रशंसा करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्यावर टीका करीत जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
मालेगावच्या उपमहापौरांच्या कक्षात टिपु सुलतान यांचा फोटो लावण्यात आला होता. त्याला प्रखर विरोध झाला. या संदर्भात आपली प्रतिक्रिया मांडताना सपकाळ माध्यमांशी बोलत होते. शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचे आहे, स्वराज्य नावाचा ज्या पद्धतीने त्यांनी विचार दिला. त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्यानंतर बराच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपु सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपु सुलतानू हे शौर्य गाजविणारे योद्धे होऊन गेले. भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. कुठल्याही विखारी, विषारी विचारांना त्यांनी जवळ केले नाही. शौर्याचे लक्षण म्हणून टिपु सुलतान यांना आपण शिवाजी महाराजांच्या समक्षक बघितले पाहिजे, असे सपकाळ म्हणाले. सपकाळचे हे वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे.
सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची शिवाजी महाराजांची तुलना केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्यावर संताप व्यक्त केला. फडणवीस म्हणाले,  हा प्रकार निंदनीय आहे. सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. काँग्रेसने नैतिकता शिल्लक असेल तर या वक्तव्याची दखल घ्यावी. काँग्रेस मित्र पक्षांनी देखील भूमिका स्पष्ट करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुण्यात गुन्हा दाखल 
पुणे येथील भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सपकाळ यांनी आपल्या वक्तव्यामधून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
‘सपकाळ निजामाची वैचारिक औलाद’
हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी हैदराबादच्या निजामाची वैचारिक औलाद आहे, असा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी जगातील कुठल्याही योद्ध्याशी होऊ शकत नाही, असे गायकवाड म्हणाले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top