mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पुतळा विटंबनेनंतर जळगावमध्ये तणाव : Tension in Jalgaon after statue desecration

शेअर करा :
Tension in Jalgaon after statue desecration : जळगाव जामोद : शहरात १४ फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजेदरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले. महिला व पुरुषांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून आरोपीच्या अटकेची मागणी केली. पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळत आरोपीस तातडीने अटक केली. 
Tension in Jalgaon after statue desecration
संतप्त नागरिक रस्त्यावर : आरोपीस अटक 
जळगाव जामोद : शहरात १४ फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजेदरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले. महिला व पुरुषांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून आरोपीच्या अटकेची मागणी केली. पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळत आरोपीस तातडीने अटक केली. रविवार, १५ फेब्रुवारी रोजी शहर बंद ठेऊन घटनेचा निषेध करण्यात आला. यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असलेल्या महामानवाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची माहिती समजताच संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. घटनेचा निषेध नोंदवित समाजबांधवांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. तसेच तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. घटनेच्या निषेधार्थ १५ फेब्रुवारीला जळगाव जामोद शहरात बंद पाळण्यात आला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
Tension in Jalgaon after statue desecration
 
आरोपीस तातडीने अटक 
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून अवघ्या काही तासांत आरोपीस अटक केली. राहुल विश्राम लांडे (वय ४०) असे विटंबना करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. यावेळी जमावाने आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, गळ्यात चपलांचा हार घालून गावातून धिंड काढा, अशी मागणी करण्यात आली. सध्या शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top