Burning of Harshvardhan Sapkals effigy : शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने राज्यभर संताप उसळला आहे. या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने बुलढाणा शहरात १५ फेब्रुवारीला सपकाळ यांच्या पुतळ्याचे चपला जोडे मारून दहन केले. तसेच यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली.

भाजप आक्रमक : कॉंग्रेस कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी
बुलढाणा : शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने राज्यभर संताप उसळला आहे. या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने बुलढाणा शहरात १५ फेब्रुवारीला हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचे चपला जोडे मारून दहन केले. तसेच यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
हे ही वाचा : हप्ता गँगकडून शेतकऱ्यास मारहाण
भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस व सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सपकाळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास चपला, जोडे मारत दहन केले. काँग्रेस पक्षाच्या शिवद्रोही व महाराष्ट्रद्रोही मानसिकतेचा निषेध व्यक्त केला. यावेळी माध्यमांशी बोलताना विजयराज शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व राष्ट्रप्रेरणा आहेत. त्यांच्या महान कार्याची तुलना कोणत्याही व्यक्तीशी करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान आहे. असे वक्तव्य हे अतिशय बेजबाबदार व अशोभनीय असून हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुद्धीची किव करणारे आहे. या प्रकरणी सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी, अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या. भाजप शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी सुद्धा काँग्रेसवर सडकून टीका करत हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

या आंदोलनात भाजपा जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, दीपक वारे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे, जिल्हा उपाध्यक्ष विलास मानवतकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. तेजराव नरवाडे, जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल, मंडळ अध्यक्ष सतीश भाकरे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष उषाताई पवार, महिला शहराध्यक्ष वर्षाताई पाथरकर, शोभाताई ढवळे, शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक संदीप नरोटे, रंजना कायस्थ, वेदाताई कथने, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष दिगंबर अंभोरे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन पवार, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे, बाजार समिती संचालक सुनील देशमुख, राजेंद्र खरात, अण्णा देवकत्ती, तुषार पडोळ, अरविंद जाधव, दशर्थसिंग राजपूत, संजय जुंबड, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर उबरहंडे, पवन बगाडे, संजय मोटे, मिलिंद चिंचोळकर, केशव बेंडवाल, मोहन निमरोट, नितीन दासार, प्रदीप सोनटक्के, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश मुठ्ठे, राजेंद्र पवार, सुभाष कदम, तुकाराम राठोड, सचिन टेंभिकर, मंडळ अध्यक्ष अनिल जाधव, सारंग एकडेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी सहभागी झाले होते.

