Annual get-together celebrated with enthusiasm at sahakar vidya mandir in De.raja: देऊळगाव राजा येथे सहकार विद्या मंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.

देऊळगाव राजा : सहकार विद्या मंदिर, देऊळगाव राजा येथील प्रारंभ वार्षिक स्नेहसंमेलन आज मोठ्या उत्साहात आणि आनंदाने पार पडले. शाळेच्या मैदानावर आणि सभागृहात रंगरंगोटी, फुलांच्या सजावटीने नटलेले वातावरण, विद्यार्थ्यांचा जोश आणि पालक, शिक्षकांची उपस्थिती यामुळे संपूर्ण कार्यक्रम एक उत्सवासारखा झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समिती देऊळगाव राजाचे गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून अमित काबरा सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सजीता सुरडकर मॅडम यांनी केलेल्या सुंदर प्रास्ताविकने झाली. सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्ञानेश्वर कापरे सर यांनी उत्तम रितीने सांभाळली.

विद्यार्थ्यांची कमाल सादरीकरण
या स्नेहसंमेलनातील मुख्य आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध प्रकारचे नृत्य, पारंपरिक महाराष्ट्रीयन, लोकनृत्य, बॉलीवूड स्टाइल आणि सांस्कृतिक नृत्यांच्या माध्यमातून मुलांनी मैदानावर आग लावली. रंगीबेरंगी वेशभूषा, संगीत आणि उत्साहपूर्ण हालचालींनी सर्वजण मंत्रमुग्ध झाले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या प्रतिभेचा साज लावला आणि प्रेक्षकांना टाळ्यांचा कडकडाट करायला भाग पाडले.
शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी आपल्या मुलांच्या कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि संघटित काम करण्याची कला वाढते.
सहकार विद्या मंदिर ही बुलढाणा जिल्ह्यातील एक नामांकित शाळा असून, CBSE संलग्न असलेल्या या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक आणि सहभागी उपक्रमांना विशेष महत्त्व दिले जाते. हा वार्षिक स्नेहसंमेलन शैक्षणिक वर्षातील सर्वोत्कृष्ट क्षणांपैकी एक ठरला.
याप्रसंगी शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

