Journalist dies in horrific accident : कारने निघालेले पत्रकार राजेंद्र सुरडकर यांचा चिखली ते जालना महामार्गावर १५ फेब्रुवारीच्या सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला.

चिखली : कारने निघालेले पत्रकार राजेंद्र सुरडकर यांचा चिखली ते जालना महामार्गावर १५ फेब्रुवारीच्या सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात तीन जन जखमी झाले.
भीषण अपघातात राजेंद्र सुरडकर (वय ३७) हे पत्रकार मृत्युमुखी पडले. चिखली तालुक्यातील बेराळा येथील रहिवासी असलेले सुरडकर यांनी चिखली येथील काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये काम केले. सुरडकर हे आपल्या तीन सहकाऱ्यांसह स्विफ्ट डिझायर कारने प्रवास करत होते. चिखली ते जालना महामार्गावर मेरा खुर्द व असोलादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळली. या भीषण अपघातात राजेंद्र सुरडकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे पोहचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. सोबतचे तीन जण जखमी झाले. मात्र त्यांची नावे समजू शकली नाही.
घरातील कर्ता पुरुष गेला
राजेंद्र सुरडकर हे घरातील कर्ते पुरुष होते. आई – वडील, पत्नी आणि एक पाच वर्षांचा मुलगा असा त्यांचा परिवार. लहानग्या मुलाच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने बेराळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

