mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

महाशिवरात्रीला बनविला ११ क्विंटल ५१ किलोचा महारोठ : 11 quintals of 51 kg of Maharoth was made on Mahashivratri

शेअर करा :

11 quintals of 51 kg of Maharoth was made on Mahashivratri : संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर ११ क्विंटल ५१ किलोचा महारोठ बनवून शिवभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

11 quintals of 51 kg of Maharoth was made on Mahashivratri
11 quintals of 51 kg of Maharoth was made on Mahashivratri

महाशिवरात्रीनिमित्त पळशी झाशी येथे महाप्रसाद
संग्रामपूर : तालुक्यातील पळशी झाशी येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर ११ क्विंटल ५१ किलोचा महारोठ बनवून शिवभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाशिवरात्रीला हजारो भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मंदिरात एकच गर्दी केली होती. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा अखंड जोपासली जात आहे.

शंकर गिरी महाराजांनी प्रसादाची परंपरा सुरू केली. महाराजांनी घालून दिलेल्या कठोर नियमाप्रमाणे आजही महारोठ बनवला जातो. वाढती लोकसंख्या बघून रोठाचे प्रमाण आधीपेक्षा वाढविले आहे. यावर्षी वर्षी ११ क्विंटल ५१ किलो एवढा महारोठ तयार करण्यात आला. हा महारोठ शिवरात्रीच्या रात्री नऊ वाजतापासून गावातील युवक तयार करतात. महारोठ निर्मितीची प्रक्रिया तसेच त्याचे स्वरूप पाहण्याकरिता परिसरासह इतरत्र ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात.

रात्री एक वाजेपर्यंत महारोठ तयार होऊन केळीच्या पानात व सुती कापडात बांधून अंगाऱ्यात टाकण्यात येतो. सकाळी सूर्योदयापूर्वी महारोठ बाहेर काढतात. महारोठाच्या प्रसादासह शिव मंदिरात आरती करून महारोठाचा नैवेद्याचे महाप्रसादाचे वितरण भक्तांना करण्यात येते. धगधगत्या अग्नीतून महारोठ बाहेर काढल्यानंतर कापडात ठेवलेला महारोठ पूर्णपणे शिजवून तयार झालेला असतो.

असा तयार होतो महारोठ


कणीक ३ क्विंटल ५० किलो, साखर ३ क्विंटल ७० किलो, १ क्विंटल २५ किलो तूप, १ क्विंटल २५ किलो दूध, दीड क्विंटल सुकामेवा, तूप व दूध घालून हा प्रसाद तयार केला जातो.

11 quintals of 51 kg of Maharoth was made on Mahashivratri

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top