mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पोलीस स्टेशन धाडमध्ये शांतता समितीची बैठक : Peace committee meeting at police station dhad

शेअर करा :

Peace committee meeting at police station dhad : पोलीस स्टेशन धाडमध्ये शांतता समितीची बैठक. शिवजयंती आणि रमजान ईद उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन

Peace committee meeting at police station Dhadबुलढाणा  :   पोलीस स्टेशन धाड हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि पवित्र रमजान ईदनिमित्त शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा ते सात  वाजेपर्यंत पोलीस स्टेशन येथे आयोजित या बैठकीत श्री छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती मंडळाचे अध्यक्ष, शांतता समितीचे सदस्य, मुस्लिम समाजाचे मौलाना आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत वरिष्ठ पोलिस कार्यालयाकडून प्राप्त सूचनांचे वाचन करून सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. दिनांक १९ फेब्रुवारी २०२६  गुरुवार  रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि रमजान ईदच्या संदर्भात  रमजान सुरू होण्याची तारीख चंद्रदर्शनानुसार १८-१९ फेब्रुवारीपासून अपेक्षित असून, ईद  मध्ये सर्वांनी जातीय सलोखा आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले.

मुख्य सूचना आणि मार्गदर्शन:
शिवजयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करावा. डीजे किंवा ध्वनीक्षेपकांचा वापर टाळावा.
मिरवणूक शांततेत आणि अनुशासितपणे पार पाडावी. मिरवणूक मार्गातील अडथळे, वाहतूक व्यवस्था याबाबत चर्चा करून योग्य उपाययोजना करण्यात आल्या.उत्सवासाठी लावलेले बॅनर, झेंडे, पताका मिरवणूक संपल्यानंतर लगेच काढून घ्यावेत.(whatsapp ,instagaram)  व इतर सोशल मीडिया वर आक्षेपार्ह किंवा भडकावणाऱ्या पोस्ट टाळाव्यात.या बैठकीत सर्व सहभागींनी एकमताने उत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरे करण्याचे आश्वासन दिले. पोलीस प्रशासनाने सर्वांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जय शिवराय, आणि रमजान मुबारक, या भावनेने सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन सलोख्याचे उदाहरण घालावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन आणि शांतता समितीच्या प्रयत्नांमुळे धाड परिसरात उत्सव सुरळीत आणि शांततेत पार पडतील, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील बुलढाणा  व  ठाणेदार प्रताप भोस यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top