mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

भूमिअभिलेख कर्मचारी आक्रमक : Land record officer aggressive

शेअर करा :

Land record officer aggressive : भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांनी न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी १८ फेब्रुवारीपासून आंदोलन छेडले आहे. मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून काळ्याफिती लावून कामकाज केले.

Land records staff aggressive

बुधवारपासून छेडले आंदोलन

बुलढाणा : भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांनी न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी १८ फेब्रुवारीपासून आंदोलन छेडले आहे. मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून काळ्याफिती लावून कामकाज केले. यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यभरातील हजारो कर्मचाऱ्यांनी कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन पुकारले. सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. याबाबत एसडीओ प्रा. संजय खडसे यांना मारुती थोरवे, गोपाल वाघमारे, श्रीकांत बुलबुले, सुनिता खडसे, प्रकाश शिंदे, भूमापक रमेश शिंदे, राजेंद्र गहेराव यांनी निवेदन दिले.

जमिनीची मोजणी करण्यापासून ते शासकीय दस्तऐवज अद्ययावत ठेवण्यापर्यंत त्यांची कामे अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाची असतात. भुकरमापक पदाची शैक्षणिक पात्रता ही अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका करण्यात आली असून या विभागातील सर्व कामे हे तांत्रिक स्वरूपाचीच आहेत. इतर विभागातील खासकरून वन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील भूकरमापक पदांवरील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन देण्यात येत असून भूमिअभिलेख विभागांमध्ये मात्र कर्मचाऱ्यांना हे लिपिकवर्गीय वेतन देण्यात येत आहे. न्याधिकरणाने (मॅट) सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिली. मात्र, अजूनही शासनाने कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू केली नाही. त्यामुळे नाराजी पसरली आहे.

२ मार्चपासून बेमुदत संप

१८ फेब्रुवारीला मोजणी साहित्य जमा करून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. २० फेब्रुवारी मोजणी काम बंद केली जाणार आहे. २३ ते २६ फेब्रुवारीपासूनसामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारीला पुण्यात जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. तरीही मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top