mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मराठी पाऊल पडते पुढे संगीत सोहळ्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद :  Music festival receives enthusiastic applause from fans

शेअर करा :

Music festival receives enthusiastic applause from fans : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित मराठी लोककला, संस्कृतीचा वारसा, परंपरा आणि सुरांची मोहिनी अनुभवण्याची संधी देणाऱ्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या भव्य संगीत सोहळ्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Music festival receives enthusiastic applause from fans

जिल्हाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती

बुलढाणा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित मराठी लोककला, संस्कृतीचा वारसा, परंपरा आणि सुरांची मोहिनी अनुभवण्याची संधी देणाऱ्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या भव्य संगीत सोहळ्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती.

छत्रपती शिवाजी महाराज महोत्सवानिमित्त आयोजित हा सांस्कृतिक कार्यक्रम बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागारात उत्साहात पार पडला. कार्यक्रमात मराठी भावगीत, लोकगीते, देशभक्तीपर गीते तसेच आधुनिक मराठी संगीताची बहारदार सादरीकरणे करण्यात आली. कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांचा कडकडाट आणि दाद मिळत होती.


या सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सपत्नीक विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत मराठी सांस्कृतिक वारसा जपण्याचे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पूजा गायकवाड, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Music festival receives enthusiastic applause from fans
Marathi Paal Padte Almala music festival receives enthusiastic applause from fans

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top