Opium crop poses a threat to the eyes : कांदा बीज उगवून बोंडे तयार होतात, त्याचाच फायदा अफूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला. अफूची बोंडे कांदा बीजाशी मिळतीजुळती असल्याने नजरेचा धोका होतो. दूरवरून पाहिल्यास ती सारखी दिसत असल्याने आजवर कुणी अफूच्या शेतीवर संशय घेतला नाही.

आसिफ शाह
मेहकर : कांदा बीज उगवून बोंडे तयार होतात, त्याचाच फायदा अफूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला. अफूची बोंडे कांदा बीजाशी मिळतीजुळती असल्याने नजरेचा धोका होतो. दूरवरून पाहिल्यास ती सारखी दिसत असल्याने आजवर कुणी अफूच्या शेतीवर संशय घेतला नाही.
सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पांगरी काटे शेत शिवारामध्ये विशाल रामेश काटे व भागवत सदाशिव काटे या दोन शेतकऱ्यांनी अफूची लागवड केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार, कृषी विभाग, महसूल विभाग यांना सोबत घेऊन कारवाई केली. एक कोटी ३३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर अफू लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन यांना न्यायालयाने १९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.
अफूची लागवड हा पोलीस तपासाचा मुद्दा असून पोलीस प्रशासन यावर बारकाईने लक्ष दिले जात आहे. पोलीस प्रशासनाने यासाठी सर्व अँगलने तपास सुरू केला आहे. एकीकडे या अफूची लागवड ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला केलेली असेल?
अफूची लागवड केल्यानंतर साधारणतः शंभर दिवसांमध्ये फुले गळून दोडे तयार होतात. या दोड्यावर चाकूने किव्हा ब्लेडने चिरा मारून त्यामधून येणारा चिक जो रात्रीच्या हवेने वर येऊन वाळतो व गडद तपकिरी रंगचा एक चिकट पदार्थ तयार होतो तो जमा करून ज्याला कच्ची अफू म्हटले जाते. मात्र या ठिकाणी जे (अफूच्या दोड्या ) बोंड सापडले, त्यावर चिरा मारलेल्या नव्हत्या. त्यामुळे या शेतकऱ्यांनी लागवड केलेली अफू ही नशेसाठी की खसखससाठी याचा शोध पोलीस घेत आहेत. सर्व बाजूंनी तपास केल्या जात आहे. या शेतकऱ्यांचे कनेक्शन हे नशा माफियासोबत होते का याचाही सुद्धा तपास केल्या जात आहे.
अफूची लागवड ही कांद्यात केली, गेली होती तर आजूबाजूला दादर पेरण्यात आली होती ज्याला पाहता ही दादर अफूचे झाडे लपवण्यासाठी तर पेरली होती का असा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे.
काहींच्या शेतामध्ये असलेले अफूचे खसखससाठी लागवड केली होती. ती सुद्धा शेतकऱ्यांनी उपटून फेकून दिली.
“याप्रकरणी सखोल तपास सुरू असून अफूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी अफूच्या दोड्याना चिरा मारलेल्या नव्हत्या. सोबतच आम्ही याप्रकरणी बारकाईने तपास करत आहोत. या शेतकऱ्यांनी अफूची लागवड कशासाठी व का केली याचा तपास सुरू आहे.
गजानन कारेवाड ठाणेदार साखरखेर्डा.

