mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बसचालक झिंगला; प्रवाशांचा जीव धोक्यात : Bus driver Zingala

शेअर करा :

Bus driver zingala : दारूच्या नशेत बस चावलून चालकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याची घटना देऊळगाव मही गावाजवळ १९ फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

Bus driver zingala

लातूर ते बुलढाणा बसमधील प्रकार
बुलढाणा : दारूच्या नशेत बस चालवून चालकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याची घटना देऊळगाव मही गावाजवळ १९ फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
मनोज बंड असे मद्यपी चालकाचे नाव आहे. चालक बंड व वाहक ए.एच. पवार हे दोघे एमएच-२०-जीसी-२५९४ क्रमांकाची बस घेऊन लातूर येथून बुलढाण्याकडे येत होते. मध्येच कुठेतरी संधी साधून चालक दारू पिवून आल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. देऊळगाव राजा येथून पुढे येताना देऊळगाव महीजवळ बस झकोले खावू लागल्याने प्रवाशांच्या पोटात धस्स झाले. आता आपले काही खरे नाही म्हणत प्रवाशांनी ओरड सुरू केली. वाहकाला सावध करण्यात आले. अखेर अपघात टाळण्यासाठी वाहकाने चालकास सुरक्षितस्थळी बस थांबविण्यास भाग पाडले. यामुळे ५७ प्रवाशांपुढे असलेला अपघाताचा धोका टळला.
वाहकाने माहिती दिल्यानंतर एसटीचे अधिकारी दाखल झाले. चालकास पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्याची माहिती आहे.

नावाप्रमाणेच बंडपणा

जी व्यक्ती उपद्रवमूल्य असते. काही ना काही खटापटी करणारी असते, तिच्याबाबत बंड व्यक्ती असा उल्लेख करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. अगदी नावाप्रमाणेच हा चालक वागल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या.

दीड तास प्रवाशांची गैरसोय
प्रवाशांना तब्बल दीड तास एकाच जागी ताटकळत बसावे लागले. अखेर दुसऱ्या बसची व्यवस्था झाल्यानंतर प्रवाशांना पाठविण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top