Another victory of Shiv Sena’s strength : शिवसेनेच्या ताकदीचा आणखी एक विजय.

बुलढाणा : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख किसनरावजी धोंडगे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली च्या उपसभापती पदावर निवड झाली आहे. ही निवड शिवसेना कार्यकर्त्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.
या यशस्वी निवडीच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा चे सभापती जालिंदर बुधवत आणि जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी किसनरावजी धोंडगे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन स्नेहपूर्वक सत्कार केला. यावेळी दोघांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात माजी पंचायत समिती सदस्य दिलीप सिनकर आणि संचालक हरीभाऊ सिनकर यांची उपस्थिती लाभली.
शिवसेना च्या एकजुटीने आणि मेहनतीने अशा यशस्वी निवडी होत राहतील, अपेक्षा व्यक्त केली.

