Proud felicitation ceremony in Dhad area on the auspicious occasion of Shiva Jayanti : शिवरायांच्या जयंतीनिमित्त धाड (ता. जि. बुलढाणा) येथे एक अतिशय भावपूर्ण आणि अभिमान वाढवणारा कार्यक्रम पार पडला.

धाड – (बुलढाणा) : शिवरायांच्या जयंतीनिमित्त धाड येथे एक अतिशय भावपूर्ण आणि अभिमान वाढवणारा कार्यक्रम पार पडला. या पावन पर्वावर परिसरातील दोन सुपुत्रांनी मिळवलेल्या यशस्वी यशाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. सुर्यराज सुनिल हिवाळे यांची लेफ्टनंट कर्नल या पदावर निवड झाली आहे. तर दीपक संजय खेडकर यांची उप संचालक, कृषी विभाग या उच्च पदावर नियुक्ती झाली आहे.
या दोघा यशस्वी व्यक्तींच्या या उत्तुंग यशाबद्दल डॉक्टर्स असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन आणि पॅथॉलॉजी असोसिएशन यांच्या वतीने खेडेकर हॉस्पिटल, धाड येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, डॉक्टर, केमिस्ट, पॅथॉलॉजिस्ट आणि परिसरातील नागरिकांनी या दोघांचे कौतुक केले. या यशामुळे धाड परिसरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा माथा उंचावला आहे. स्थानिक युवकांसाठी ही प्रेरणादायी गोष्ट ठरली आहे.

