Mahatma Phule, Dr. Ambedkar Jayanti Celebration Committee meeting on Monday : महात्मा फुले, डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समितीची सोमवारी बैठक.
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीची सोमवारी बैठक
बुलढाणा : महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची सोमवार, २३ फेब्रुवारीला बैठक आयोजित करण्यात आली आहे.
स्थानिक विश्राम गृहात सायंकाळी ६ वाजता ही बैठक होणार आहे. यामध्ये जयंती उत्सव समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. त्यानुसार यंदाही, प्रबोधनात्मक आणि वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे, आयोजन करण्यासाठी नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे, याच अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे सायंकाळी सहा वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बुलढाणा शहरातील तमाम आंबेडकरी जनतेने या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे मावळते अध्यक्ष नीलेश राऊत यांनी केले आहे.

