mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पाचवी व आठवीची रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा : Scholarship exam for 5th and 8th graders on Sunday

शेअर करा :

Scholarship exam for 5th and 8th graders on Sunday : पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी २२ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे.

Scholarship exam for 5th and 8th graders on Sunday

२८ हजार ६९ विद्यार्थी देणार परीक्षा

बुलढाणा : पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी २२ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. २८ हजार ६९ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यामध्ये इयत्ता पाचवीचे १२६ केंद्र व इयत्ता आठवीचे १०५ केंद्र, असे एकूण २३१ केंद्र परीक्षेसाठी  स्थापन करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या ६६१६६ व इयत्ता आठवीचे शिष्यवृत्तीला प्रविष्ट विद्यार्थी संख्या ११९०३  एवढी आहे. जिल्हास्तरावरून तेरा तालुक्यामध्ये भरारी पथक  नेमण्यात आले आहे. तालुकास्तरावर सुद्धा भेटीचे नियोजन केले आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्विकास पाटील व जिल्हा समन्वयक जयमाला राठोड यांनी सर्व केंद्र  संचालकांना परीक्षाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.  कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. परीक्षेसाठी ईश्वर वाघ, गजानन वाघ, श्रीकृष्ण जाधव हे सहायक जिल्हा समन्वयक आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top