Farmer dies while going to fetch water : पाणी द्यायला गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
पाण्याच्या पाटात आढळला मृतदेह
चिखली : ‘शेतात पाणी द्यायला जातो’ म्हणून शेतात गेलेल्या भरोसा येथील तरुण शेतकऱ्याचा मृतदेह पाटाच्या पाण्यात आढळून आला.
सागर कचरूबा जोहारे (वय २४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सागर जोहारे हा १९ तारखेला शेतात पाणी देण्याकरिता जातो म्हणून घराबाहेर पडला होता. मात्र, तो घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला; परंतु तो सापडला नाही. २१ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजेच्या सुमारास खडकपूर्णा धरणाच्या पाटाच्या पाण्यात त्याचा मृतदेह पाटाच्या जाळीत आढळून आला.
घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नेला.

