806 students appeared for the exam : जिल्ह्यात रविवारी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आली. २७ हजार २६६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षांना २८ हजार ७२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यापैकी पाचवीचे ४२८ विद्यार्थी अनुपस्थित होते. तर आठवीतील ३७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. पाचवी, आठवीतील एकूण ८०६ विद्यार्थी अनुपस्थित होते.

२७२६६ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा
बुलढाणा : जिल्ह्यात रविवारी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आली. २७ हजार २६६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षांना २८ हजार ७२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यापैकी पाचवीचे ४२८ विद्यार्थी अनुपस्थित होते. तर आठवीतील ३७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. पाचवी, आठवीतील एकूण ८०६ विद्यार्थी अनुपस्थित होते.
इयत्ता पाचवीसाठी १२६ केंद्र व इयत्ता आठवीचे १०५ असे २३१ परीक्षा केंद्र होते. पाचवीसाठी १६ हजार १६८ पैकी १५ हजार ७४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आठवीच्या ११ हजार ९०४ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ५२६ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हास्तरावरून तेरा तालुक्यामध्ये भरारी पथक नेमलेले होते. तालुकास्तरावर भेटीचे नियोजन करण्यात आले.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी मलकापूर तालुक्यातील केंद्रांना भेटी दिल्या. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल अकाळ तसेच उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिल देवकर, अकिल शेख व उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) क्षीरसागर यांच्यासह जिल्हास्तरावरील शिक्षण विभागातील सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी आणि तालुका स्तरावरील सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हा समन्वयक जयमाला राठोड, सहायक जिल्हा समन्वयक ईश्वर वाघ, गजानन वाघ यांनी परिश्रम केले. तसेच तालुकास्तरावरील तालुका समन्वयक यांनी सुद्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठो परिश्रम घेतले.

