Thieves steal silver; jewellery worth Rs. 4.5 lakhs stolen: चोरट्यांची चांदी; साडेचार लाखांचे दागिने पळवले सीसी कॅमेऱ्यात चोरटे जेरबंद.

धाड : चोरट्यांनी दुधा येथील गजानन ज्वेलर्स फोडून ४ लाख ८० हजार रुपयांचे चांदीचे दागिने पळविले. २५ फेब्रुवारीच्या पहाटे एक वाजण्याच्या सुमारास चोरटे चोरी करून फरार झाले.
धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरूड येथील रहिवासी वैभव अनंत खांडवीकर (वय २८) यांचे दुधा येथे गजानन ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. चोरटे चारचाकी कारने आले आणि सराफा दुकाने फोडले. १२ प्लास्टिक डब्यांमध्ये ठेवलेल्या प्रत्येकी ४८ चांदीच्या अंगठ्या (१६०० ग्रॅम, किंमत ३ लाख रुपये) चांदीच्या चेनपट्ट्या ३० नग तसेच चांदीचे जोडपे ५० (८०० ग्रॅम, किंमत १ लाख ८० हजार) असा एकूण ४ लाख ८० हजारांचा चांदीच्या दागिन्यांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही चोरी सीसी कॅमेऱ्याने टिपली आहे. ज्वेलर्समध्ये शिरल्यानंतर चोरट्यांनी कुठलीही भीती न बाळगता चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.

कारमधून आले चोरटे
तीन ते चार चोरटे अलीशान चार चाकी कारनने आल्याचे सीसी कॅमेऱ्यात दिसत आहे. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. घटनेचा तपास पीएसआय परमेश्वर केंद्रे करीत आहेत.

