Firefight at Mehkar : सारंगपूर झोपडपट्टी बायपास रोडवर २५ फेब्रुवारीच्या रात्री नऊ वाजता शॉर्टसर्किट होऊन अग्नितांडव घडले. चार दुकाने पूर्णतः जळू खाक झाली.
बायपासवरील सारंगपूर झोपडपट्टीजवळील चार दुकाने जळून खाक, लगतच्या दुकानाचे मोठे नुकसान
आसिफ शाह
मेहकर : सारंगपूर झोपडपट्टी बायपास रोडवर २५ फेब्रुवारीच्या रात्री नऊ वाजता शॉर्टसर्किट होऊन अग्नितांडव घडले. चार दुकाने पूर्णतः जळू खाक झाली. तर अन्य दुकानांनादेखील आगीची मोठी झळ बसली.

आधी टायरच्या दुकानाला आग लागली. या आगीने रुद्र धारण केल्याने आग पसरली आजूबाजूच्या दुकानांनाही आगीने कवेत घेतले. टायर पंचरचे दुकान, इलेक्ट्रिशियनचे दुकान, पानपट्टी, हॉटेल अशा काही दुकानांचे अतोनात नुकसान झाले. तर काही दुकाने जळून पूर्णपणे खाक झाली. यावेळी आगीचे लोळ दिसताच सारंगपूर झोपडपट्टी परिसर, सारंगपूर येथील लोक व मेहकर अग्निशमन दलाच्या गाड्यांमधील जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रण मिळाले नसते तर मोठा अनर्थ घडला असता. या परिसरातील सर्व दुकाने जळून खाक झाली असती. मात्र गावकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी कोणाचे किती नुकसान झाले, याची माहिती मिळू शकली नाही.
मेहनत करीत या दुकानाच्या भरवशावर सुरू केलेला संसार डोळ्यांसमोर जळत असताना पाहून हतबल होऊन पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

