mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

एक लाखात पडला चहा! : Tea cost one lakh!

शेअर करा :

Tea cost one lakh! : एक लाखात पडला चहा

Tea cost one lakh!

बुलढाणा
एका व्यक्तीला एक कपभर चहा चक्क एक लाख रुपयांत पडला! मथळा वाचून नक्कीच दचकलात ना? होय, पण चहा घेत असताना झालेली बेफिकिरी पाहता चोरट्याने एक लाख रुपये ठेवलेली लेदरची बॅग पळविल्याने हा चहा लाखाचा झाला. नांदुरा येथे लाख रुपये चोरीची ही घटना उघडकीस आली.

पलसोडा येथील दिनेशसिंह प्रमोदसिंह राजपूत हे नांदुरा येथील बसस्थानकासमोरील दीपक रेस्टॉरंटमध्ये २५ फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास चहा घेण्यासाठी गेले होते. सोबत सुनगाव येथील त्यांचे नातेवाइक चैनसिंग राजपूतही होते. चहा घेतल्यानंतर बिल देण्यासाठी गेले असता त्यांना आपल्याजवळील बॅग गायब असल्याचे दिसले. त्यामध्ये एक लाख पाच हजार रुपये होते. तसेच नांदुरा अर्बन बँक व सेंट्रल बँकेचे पासबुक, चेकबुक तसेच आधार कार्ड होते. तेदेखील चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी नांदुरा पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मिलिंद जवंजाळ करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top