mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

आता व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटने करा तक्रारी दाखल : Now file complaints using WhatsApp chatbot

शेअर करा :

Now file complaints using WhatsApp chatbot : आता व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट  सुविधेद्वारेदेखील नागरिकांना आपले अर्ज किंवा तक्रारी दाखल करता येतील.

Now file complaints using WhatsApp chatbot

२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाहीदिन

बुलढाणा : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी आणि प्रशासकीय अडचणींचे वेळेत निराकरण करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट  सुविधेद्वारेदेखील नागरिकांना आपले अर्ज किंवा तक्रारी दाखल करता येतील.

नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या मांडण्यासाठी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लोकशाही दिनात तक्रार सादर करताना नागरिकांनी विहित अर्ज केवळ शासनाने ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यातच असावा, तक्रार किंवा निवेदन केवळ वैयक्तिक स्वरूपाचे असावे (सामूहिक स्वरूपाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत), अर्जाच्या दोन प्रती, संबंधित लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस आधी सादर करणे आवश्यक आहे.

तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हा स्तरावर, तर जिल्हा स्तरांनंतर २ महिन्यांनी विभागीय आणि त्यानंतर २ महिन्यांनी मंत्रालयीन स्तरावर अर्ज करता येईल. कोणत्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच न्यायप्रविष्ट (Court Cases) प्रकरणे, राजस्व अपील्स (Revenue Appeals), सेवाविषयक किंवा आस्थापनाविषयक बाबी.
अपूर्ण कागदपत्रे जोडलेले किंवा विहीत नमुन्यात नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. स्वीकारार्ह नसलेले अर्ज संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी ८ दिवसांत पाठवून त्याची प्रत अर्जदारास दिली जाईल.

नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आता नागरिक आपल्या तक्रारी आणि अर्ज ९४२३१८४८०४ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर चॅटबॉटद्वारे देखील सादर करू शकतात. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी या लोकशाही दिनाचा सकारात्मक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top