mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अनिकेतची हत्या : Anikets murder

शेअर करा :

Anikets murder : पोफळीच्या अनिकेत ऊर्फ गणेश निवृत्ती सुरडकर बत्तीसवर्षीय तरुणाची पाच जणांनी लाठ्याकाठ्या व लोखंडी आसाऱ्यांनी हल्ला करून हत्या केली.

Anikets murder


पाच जणांकडून निर्दयीपणे हल्ला


मोताळा : पोफळीच्या अनिकेत ऊर्फ गणेश निवृत्ती सुरडकर बत्तीसवर्षीय तरुणाची पाच जणांनी लाठ्याकाठ्या व लोखंडी आसाऱ्यांनी हल्ला करून हत्या केली. शुक्रवार, २७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता ही खळबळजनक घटना घडली.
मोताळा तालुक्यातील पोफळी येथील अनिकेत ऊर्फ गणेश निवृत्ती सुरडकर याचा काही तरुणांशी किरकोळ वाद झाला होता. त्याचा वचपा अनिकेतची हत्या करून काढण्यात आला. २७ फेब्रुवारी रोजी गावाजवळील शेतशिवारात अनिकेतला गाठून ब्रह्मानंद ऊर्फ धम्मा सुरडकर, लकी ऊर्फ प्रफुल्ल संतोष इंगळे, कृणाल जानराव सुरडकर, नीलेश बाळ बोदडे व क्रिष्णा रमेश अंभोरे यांनी बेदम मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत असलेल्या अनिकेतला आरोपींनी पकडून पकडून मारले.
धामणगाव बढे पोलिसांनी आरोपी ब्रह्मानंद सुरडकर, कृणाल सुरडकर, नीलेश बोदडे व  क्रिष्णा रमेश अंभोरे यांना अवघ्या अडीच तासांत अटक केली. लकी ऊर्फ प्रफुल्ल संतोष इंगळे हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top