mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

दोन सख्ख्या भावांसह मित्रावर काळाचा घाला; आयशरने दुचाकीस उडविल्याने तिघे ठार : Times attack on a friend with two close brothers

शेअर करा :

Times attack on a friend with two close brothers : भरधाव वेगातील आयशरने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांसह एका मित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Times attack on a friend with two close brothers

तेल्हारा-माळेगाव मार्गावर दुर्घटना

मतीन शेख
अकोला :  भरधाव वेगातील आयशरने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांसह एका मित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेल्हारा–माळेगाव मार्गावर १ मार्च रोजी ही दुर्घटना घडली. तिघेही अल्पवयीन होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दर्शन रामेश्वर वैष्णव आणि साई रामेश्वर वैष्णव हे सख्खे भाऊ व त्यांच्यासोबतचा मित्र गणेश अपतुरकार हे तिघेही अपघातात ठार झाले. तिघे दुचाकीवर ट्रीपल सीट निघाले होते. दरम्यान, तेल्हारा ते माळेगाव मार्गावर आयशरने दुचाकीस जोराची धडक दिली. दोघांचा जागीच मृत्यू झाला. तिसरा रुग्णालयात नेताना दगावला.

घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दोन सख्ख्या भावांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताने पुन्हा एकदा वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top