mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

एकीकडे धुळवडीचा आनंदोत्सव, दुसरीकडे आनंदने संपविले जीवन :  On one hand, the joy of dust, on the other hand, Anand ended his life

शेअर करा :

On one hand, the joy of dust, on the other hand, Anand ended his life : घाटनांद्रा येथील आनंद राजू भटकर याने धुलीवंदनाच्या दिवशी आत्महत्या केली.

Anand ended his life

घाटनांद्रा येथील घटना

सैलानी : घाटनांद्रा येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ मार्च २०२६ च्या दुपारी उघडकीस आली. एकीकडे धुळवडीलाच आनंद सुरू असताना आनंदने जगाचा निरोप घेतल्याने खळबळ उडाली आहे.

आनंद राजू भटकर (वय २५) असे मूर्त तरुणाचे नाव आहे. सैलानीपासून जवळच असलेल्या घाटनांद्रा येथील तो रहिवासी होता. अशोक सुरडकर यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोराच्या साह्याने आनंदाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. ही घटना समजतात अशोक सुरडकर यांनी रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेचा अधिक तपास ठाणेदार नीलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कैलास खार्डे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top