mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

विवाहितेची आत्महत्या :   हुंड्यासाठी जाच : Married woman commits suicide : probe underway for dowry

शेअर करा :

Married woman commits suicide; probe underway for dowry : पतीसह सासरच्या लोकांनी हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून केलेल्या छळाला कंटाळून एका वीसवर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Married woman commits suicide : probe underway for dowry

सासरच्यांना सून नव्हे, पैसाच प्यारा‘; पती, सासू, सासऱ्यासह दीराविरुद्ध गुन्हा दाखल
सिंदखेड राजा : पतीसह सासरच्या लोकांनी हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून केलेल्या छळाला कंटाळून एका वीसवर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासू, सासरा आणि दीर अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रोहिणी प्रवीण म्हस्के असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून पती प्रवीण म्हस्के, सासरे ब्रह्मानंद आनंदा म्हस्के, सासू विमल ब्रह्मानंद म्हस्के आणि दीर प्रदीप ब्रह्मानंद म्हस्के यांनी ‘हुंडा कमी दिला’ या कारणावरून रोहिणीचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. त्यानंतर  पतीसाठी व्यवसायाकरिता चारचाकी वाहन घेण्यासाठी आणखी एक लाख रुपये आणण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. पैशांची मागणी पूर्ण न झाल्यास मारहाण केली जात होती. तसेच ‘पैसे आण नाहीतर घरी येऊ नकोस’ अशा धमक्या दिल्या.
दरम्यान, समेट घडवून आणण्याच्या उद्देशाने मुलीच्या माहेरच्यांनी एकदा दहा हजार रुपये दिले होते. मात्र, त्यानंतरही पैशांसाठी त्रास सुरूच होता. २ मार्च २०२६ रोजी सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून रोहिणीने आत्महत्या केली.
या प्रकरणी तालुक्यातील बोराखेडी बुद्रुक येथील रहिवासी परमेश्वर बाबासाहेब मोरे (वय ४२) यांनी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर शिंदे आणि बीट जमादार रविराज चव्हाण करीत आहेत.


दीड वर्षाचा विश्वराजचे मातृछत्र हरविले
आई रोहिणीने आत्महत्या केल्याने दीड वर्षाचा विश्वराज मातृप्रेमाला मुकला आहे.   पोलिसांनी सासरच्या लोकांना ताब्यात घेतले आहे. घरात कोणी नसल्याने दीड वर्षाच्या मुलाचा सांभाळ कुणी करायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top