Bike crashes into divider; one killed, one injured : रिसोड–मालेगाव मार्गावर गवळी फार्म हाऊसजवळ दुचाकी नाल्याच्या पुलावर दुभाजकामध्ये धडकून झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

धुलीवंदनाच्या दिवशी दुर्घटना
रिसोड : रिसोड–मालेगाव मार्गावर गवळी फार्म हाऊसजवळ दुचाकी नाल्याच्या पुलावर दुभाजकामध्ये धडकून झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ३ मार्चला दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथील रहिवासी पवन सुरेश खंडागळे (वय १९) हा या अपघातात ठार झाला. त्याच्या सोबतचा गौरव पाचरणे (वय २०) हा तरुण जखमी झाला आहे. दोघे युवक दुचाकीवरून मालेगावच्या दिशेने रिसोडकडे येत असताना त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला नालाच्या पुलांमधील दुभाजकामध्ये धडकली. अपघातात पवन खंडागळे हा तरुण जागीच ठार झाला. गंभीर जखमी झालेल्या गौरव यास पुढील उपचाराकरिता वाशीम येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.
धुलीवंदनासारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


