mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

प्रेम प्रकरणातून युवकाचा खून : Murder of a young man due to love affair

शेअर करा :

Murder of a young man due to love affair : केनवड येथे कापड दुकान चालविणाऱ्या राहुल बाजड या युवकाचा मेहकर परिसरात खून झाला. या हत्येला प्रेमाची किनार असल्याची चर्चा आहे.

Murder of a young man due to love affair

मेहकरच्या खंडाळा एमआयडीसी परिसरातील घटना
डोणगाव : वाशीम जिल्ह्यातील केनवड येथे ‘आपलं कलेक्शन’ हे कापड दुकान चालवणाऱ्या राहुल खुशालराव बाजड या युवकाचा मेहकर परिसरात खून झाल्याची घटना ४ मार्चच्या सकाळी उघडकीस आली.

राहुल बाजड हा मूळचा मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी होता. मागील काही वर्षांपासून तो वाशीम जिल्ह्यातील जाम आढाव येथे मामाच्या घरी राहत होता. केनवड येथे त्याने कापड दुकान सुरू केले. ३ मार्च रोजी अज्ञात आरोपीने राहुल बाजड याचा चेहरा दगडाने ठेचून खून केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहकर ठाणेदार व्यंकटेश आलेवार, एपीआय संदीप बिरांजे, एपीआय जारवाल, पोहेकॉ लक्ष्मण कटक, मोहम्मद परसुवाले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच फॉरेन्सिक टीम बोलवण्यात आली आहे.
हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top