mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पत्नीला त्रास देणाऱ्या युवकाचा पतीने काढला काटा! : Husband fires young man who harassed his wife

शेअर करा :

Husband fires young man who harassed his wife : दगडाने ठेचून हत्या केलेल्या राहुल बाजड या तरुणाच्या मारेकऱ्याचा मेहकर पोलिसांनी काही तासांमध्येच शोध घेत त्याला गजाआड केले. पत्नीला त्रास देत असल्याने संतप्त झालेल्या पतीने हे हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

Husband fires young man who harassed his wife

मेहकर पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य : आरोपी गजाआड : दगडाने ठेचून केली हत्या

आसिफ शाह
मेहकर : दगडाने ठेचून हत्या केलेल्या राहुल बाजड या तरुणाच्या मारेकऱ्याचा मेहकर पोलिसांनी काही तासांमध्येच शोध घेत त्याला गजाआड केले. पत्नीला त्रास देत असल्याने संतप्त झालेल्या पतीने हे हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

ओम श्यामराव केनवडकर (वय ३६) असे राहुलचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो केनवड (ता. रिसोड, जि. वाशीम) येथील रहिवासी आहे.
मेहकर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील शेतात ४ मार्चच्या सकाळी ९ वाजता राहुल भानुदास बाजड (वय २८) याचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मेहकर पोलिसांनी वेगवान तपासचक्रे फिरवत या गुन्ह्यातील आरोपीला ४ मार्चच्या सकाळीच ११ वाजेच्या सुमारास अटक केली.

मृतदेह आढळून आल्याने मेहकर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट तसेच डॉग स्कॉड यांना त्वरित पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार व्यंकटेश आलेवार व टीमने  जांब आढाव (ता. रिसोड, जि. वाशिम) याची ओळख पटवली. मृतकासोबत कोणाचे काय बिनसले आहे का? याचा तपास सुरू करण्यात आला. गोपनीय माहिती व तांत्रिक तपास विश्लेषणाची मदत घेत पोलिसांनी आरोपीस हुडकून काढले. केनवड येथून संशयित आरोपी ओम केनवडकर याला त्याच्याच मालकीच्या शेतातून ४ मार्चच्या सकाळी साडेअकरा वाजता ताब्यात घेतले. आरोपीला विश्वासात घेऊन कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने खुनाच्या कबुली दिली.

समजाविल्यानंतरही वागण्यात झाला नाही बदल

मृतक राहुल हा मागील काही

काळापासून पत्नीस वारंवार त्रास देत होता. समजावून सांगूनही तो सुधारला नाही. त्याच्या वागण्यात बदल न झाल्याने आरोपीने त्याचा वचपा काढला. ३ मार्च रोजी मेहकर येथील खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील शेतामध्ये नेऊन दगडाने मारहाण करून त्याचा खून केल्याचे आरोपीने कबूल केले. संजय किसन वाघ (वय ४०) यांच्या  फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांची यशस्वी कामगिरी
पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड,  उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार, सपोनि संदीप बिरांजे, सपोनि अशोक अवचार, पोउपनि गणेश कड, पोउपनि कांचन जारवाल, सफौ. सुरेश काळे, सुखदेव गव्हाणे, पोहेकॉ लक्ष्मण कटक, सुखदेव ठाकरे, संजय पवार, प्रभाकर शिवणकर, पोकॉ मोहम्मद परसुवाले, विलास झोटे, अमोल परिहार, इब्राहिम परसुवाले, करिम शहा, शिवानंद तांबेकर, विठठल पैठणे, गजानन लहाने, अशोक घोगे, सुनील देशमुख, विनोद पवार, संदीप भोंडाणे, शिवाजी चिम, आम्रपाली सरकटे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोकॉ कैलास ठोबरे आणि उषा वाघ यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

     

सदर खून प्रकरणांमध्ये काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. खून झालेला युवक राहुल बाजड व आरोपी यांचे पटत नसल्याने राहुल बाजड याला मेहकरला कोणी आणले, याची माहिती आरोपीला कोणी दिली, आरोपी हा एकटाच होता की त्याच्यासोबत आणखी साथीदार होते का, असे अनेक प्रश्न यानिमित्त चर्चिल्या जात आहेत.

Husband fires young man who harassed his wife

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top