mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पाच रुपयांत करा पोटभर जेवण; खामगाव बाजार समितीत ‘शिदोरी गृह’चा शुभारंभ : Get a full meal for five rupees

शेअर करा :

Get a full meal for five rupees : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना अवघ्या पाच रुपयांमध्ये पोट भरून जेवण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Have a full meal for five rupees

6शेतकऱ्यांसाठी खास सुविधा : सागर फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन

खामगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना अवघ्या पाच रुपयांमध्ये पोट भरून जेवण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाहेरगावाहून शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी बांधवांना उपाशीपोटी राहावे लागू नये, या उद्देशाने ‘शिदोरी गृह’ सुरू करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ बुधवार, ४ मार्च रोजी करण्यात आला.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागर फुंडकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. विदर्भातील नामवंत बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या खामगाव बाजार समितीत जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. शेतमाल विक्री होऊन पैसे हातात मिळेपर्यंत अनेकदा दिवसभर थांबावे लागत असल्याने शेतकऱ्यांची उपासमार होत होती. ही बाब लक्षात घेऊन बाजार समितीने ‘शिदोरी गृह’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमांतर्गत शेतकरीबांधवांना केवळ ५ रुपयांत भरपेट जेवण उपलब्ध होणार आहे. यामध्ये अडत्यांचा १० रुपयांचा वाटा तर शेतकऱ्यांचा ५ रुपयांचा वाटा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्पदरात स्वादिष्ट आणि पौष्टिक आहार मिळणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली ग्रुपचे अध्यक्ष तथा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते ज्ञानेश्वर पाटील होते.  यावेळी बोलताना पाटील म्हणाले, बाजार समितीचा हा उपक्रम शेतकरीहिताचा असून, शेतकऱ्यांचा आत्मा तृप्त होईपर्यंत त्यांना उत्तम भोजन द्यावे तसेच भविष्यातही शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक योजना राबवाव्यात, असे आवाहन केले.

प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाजार समितीचे शासकीय सचिव गजानन आमले यांनी केले. यावेळी बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण टिकार, उपसभापती संघपाल जाधव, सेवक समिती प्रमुख राजेश हेलोडे, लायसन्स प्रमुख मंगेश इंगळे, संचालक गणेश माने, विनोद टिकार, किंमत कोकरे यांच्यासह सुरेश तोमर, रामकृष्ण भारसाकळे, अजय तायडे, पंजाबराव देशमुख, नीलेश देशमुख, मनीष देशमुख तसेच शेतकरीबांधव व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top