mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

शासनाच्या योजनांचा रथ पोहोचणार २३० गावांमध्ये : The chariot of government schemes will reach 230 villages

शेअर करा :

The chariot of government schemes will reach 230  villages : शासनाच्या योजनांचा रथ पोहोचणार २३० गावांमध्ये.

The chariot of government schemes will reach 230 villages

जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रचार रथ मार्गस्थ

बुलढाणा दि. 6 : शासनाच्या सामाजिक न्याय तसेच शासनाच्या विविध विभागांच्या लोककल्याणाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणारे चित्ररथाला आज जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी केले. हे प्रचाररथ बुलढाणा जिल्ह्याच्या 13 तालुक्यातील २३०  गावांमध्ये शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहेत.

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती घटकांसाठी तसेच सामान्य योजनेद्वारे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविला जात आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी राहूल पवार, जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी, माहिती सहायक सतिश बगमारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेतून विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे, विविध शिष्यवृती योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन, शासकीय पुनर्वसन योजना, राजर्षि शाहू गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, कन्यादान योजना, स्वाधार योजना इ. तसेच जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत कृषी विभाग, महसूल विभाग, जिल्हा कौशल्य विभाग, पुरवठा विभाग अशा विविध विभागाच्या शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. चित्ररथामध्ये असणाऱ्या एलईडी दृकश्राव्य चित्रफितींच्या माध्यमातून व फ्लेक्स बोर्डांद्वारे माहिती दिली जाणार आहे. हे प्रचाररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात फिरणार आहे. जिल्ह्यातील २३०  गावांमधून हे अभियान राबविले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top