mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

संपूर्ण शेतमाल खरेदी होईपर्यंत नाफेड केंद्रे सुरू ठेवा : जालिंदर बुधवत

शेअर करा :
Continue NAFED centers until all agricultural produce is purchased
Continue NAFED centers until all agricultural produce is purchased


खरेदीचे उद्दिष्ट संपले तरी शेतमाल घरातच पडून!

बुलढाणा : ‘पेरलं तर पिकत नाही आणि पिकलं तर योग्य भावात विकत नाही’ असा दुहेरी मार शेतकरी सहन करत आहेत. काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल योग्य भावात विकल्या जात नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. नाफेडअंतर्गत शेतमाल खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. यात मका, सोयाबीन, तसेच इतर शेतमाल तसेच सीसीआयची कापूस खरेदी केंद्र देखील बंद पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या घरातील शेती उत्पादनाचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत ही खरेदी केंद्र सुरू ठेवावीत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात आज जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात २०२५- २६ च्या खरीप हंगामात एकूण ५२,८५५.७ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली आहे. नाफेडच्या निकषानुसार हेक्टरी ३९ क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास जिल्ह्यात अंदाजे २०,६१,३७२.३ क्विंटल मका उत्पादन अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात केवळ ६०,००० क्विंटल इतकेच खरेदी उद्दिष्ट देण्यात आले आहे. जे एकूण उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. जिल्ह्यातील सुमारे ५,७०० शेतकऱ्यांनी नाफेडकडे मका खरेदीसाठी नोंदणी केलेली असतानाही मका खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याने अनेक नाफेड खरेदी केंद्रांवर मका खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मका शेतकऱ्यांकडे शिल्लक पडून असून बाजारभाव घसरत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपेक्षित उत्पादनाच्या प्रमाणात नाफेड मका खरेदीचे उद्दिष्ट तातडीने वाढवून द्यावे. तसेच बंद असलेली नाफेडची सर्व मका खरेदी केंद्रे त्वरित सुरू करून नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचा मका हमीभावाने खरेदी होईल, याची खात्री करावी. सोयाबीन देखील शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडून आहे. त्या संदर्भातही तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.
सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर अनिश्चित आहेत.
हमी केंद्रांवरील दर निश्चित आहेत. शेतकऱ्यांनी सीसीआयला प्राधान्य दिले होते. गेल्या चार महिन्यांपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होती. मात्र आता खरेदी बंद पडत असल्याच्या तक्रारी येत असून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल. यामुळे आर्थिक शोषणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या घरातील कापूस खरेदी होईपर्यंत सीसीआय केंद्र सुरू ठेवावेत.
यावेळी राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, डी.एस. लहाने, जिल्हा संघटक ॲड. सुमित सरदार, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, नगराध्यक्ष किशोर गारोळे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, गजानन ठोसर, तालुकाप्रमुख दादाराव खार्डे, श्रीकिसन धोंडगे, विजय इतवारे, विजय इंगळे, निंबाजी पांडव, तालुकाप्रमुख राजू बुधवत, दीपक चांभारे,युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, युवासेना तालुकाप्रमुख मोहित राजपूत, युवासेना तालुकाप्रमुख सिद्धेश्वर आंधळे, नितेश देशमुख, शहरप्रमुख नारायण हेलगे, हरिदास गणबास, रफिकभाई बर्तनवाले, सय्यद वशीम, बाळूभाऊ लोखंडे, महादेव पवार, गजानन मेहेत्रे, विश्वनाथ पुरकर, सत्तार शहा, हरिभाऊ सिनकर, सुधाकर आघाव, भगवान नरोटे, नीलेश तायडे, रफिक शेख, सुनील भाग्यवंत, विजय राऊत, दिलीप राजभोज, पंजाबराव गवई, बबन खरे, किरण पाटील, संदीप जाधव, चांगदेव जाधव, मो. सोफियान, गजानन गवई, संजय गवळी, निलेश हरकल, गौरव देशमुख, गजानन मुळे, काशीनाथ बिचकुले, विनोद ढोण मामा, निर्मल इंगळे, गणेश शेवाळकर, रामदास सपकाळ, संतोष डब्बे, मधुकर महाले, प्रकाश डोंगरे, दीपक पिंपळे, गणेश रिंढे, श्रीकांत जाधव, अरविंद डहाके, नागेश पऱ्हाड, रुपेश लकडे, महिला उपजिल्हाप्रमुख प्रतीक्षाताई पिंपळे, अनिता गायकवाड, अर्चना शेळके, अर्चना गायकवाड, रत्ना शेळके, पल्लवी शेळके, स्मिता वराडे, सविता बैरागी, नीता चव्हाण, सुवर्णा जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्राचालकांनी केली आर्थिक लूट

गतकाळामध्ये नाफेड केंद्रांवर केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांकडून दोनशे रुपये अधिकचे उकळण्यात आले. त्यामुळे येत्या काळात ही लूट देखील थांबवावी. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील याप्रसंगी देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top