mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चिखली मतदारसंघात मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश : A large number of people joined BJP in Chikhali constituency

शेअर करा :

A large number of people joined BJP in Chikhali constituency : चिखली मतदारसंघात मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश

A large number of people joined BJP in Chikhali constituency

बुलढाणा : भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रेरणादायी नेतृत्वात राबवण्यात येणाऱ्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवत आज चिखली विधानसभा मतदारसंघातील अनेक मान्यवर नेते, पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या शुभहस्ते व माझ्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

पक्षप्रवेश केलेल्या मान्यवरांमध्ये सर्वश्री नंदू भाऊ सवडतकर माजी नगराध्यक्ष, माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, चिखली, अरविंद देशमुख संचालक खरेदी विक्री, संचालक जिनिंग प्रेसिंग चिखली, माजी सभापती पंचायत समिती चिखली, डॉ. गुलाबराव सपकाळ, राहुल सवडतकर काँग्रेस शहराध्यक्ष, चिखली, दयानंद खरात माजी उपसभापती, चिखली, दिलीप नरवाडे माजी सरपंच, शेलोडी, प्रा. विजय घ्याळ शेलसुर, सरपंच अरुण सरनाईक शेळगाव जहागीर, जगन्नाथ अंभोरे, सरपंच अनिल फेपाळे रुईखेड, शिवाजी नपते उपसरपंच, सतीश वाघमारे, गणेश फेपाळे, राहुल काकफळे, सिद्धार्थ मगर सर्व ग्रामपंचायत सदस्य, रुईखेड, भागवत नेवरे, ज्ञानेश्वर रामेकर माजी उपसरपंच, शेणफड नेमणार, अमोल काकडे भालगाव, नितिन घेवंदे माजी उपसरपंच, शेलगाव/अन्वी गट ग्रामपंचायत, सागर सुरडकर सदस्य ग्रामपंचायत, मदन आंभोरे, अमोल सरनाईक, गजानन ठेंग, गजानन चव्हाण, नितीन अंभोरे यांचा समावेश आहे.

या सोहळ्यास चिखली नगर परिषदेचे अध्यक्ष सर्वश्री मा. पंडितदादा देशमुख, शहराध्यक्ष सागर पुरोहित, तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, अमडापूर मंडळ अध्यक्ष अमोल साठे, सुधीर तांबट, नगरसेवक दीपक खरात, अनिल सपकाळ, गजानन पवार, सचिन गरड यांच्यासह गजानन परिहार, धनंजय भगत, विजय वाळेकर शहराध्यक्ष, युवा मोर्चा, सागर वायाळ, अच्युतराव रिंढे पाटील आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top