mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बँक कर्मचाऱ्यासह दोघे ठार; दुचाकींमध्ये अपघात  : Two killed in motorcycle accident, including bank employee

शेअर करा :
Two killed in motorcycle accident, including bank employee : चिखली ते बुलढाणा मार्गावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात बँक कर्मचाऱ्यासह दोन तरुण ठार झाले. 
Two killed in motorcycle accident, including bank employee
बुलढाणा ते चिखली मार्गावर भीषण अपघात 
बुलढाणा : चिखली ते बुलढाणा मार्गावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात बँक कर्मचाऱ्यासह दोन तरुण ठार झाले. बुलढाणा ते चिखली मार्गावर हातणी गावाजवळ ७ मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला.
मेहकर तालुक्यातील मोसंबेवाडी येथील रहिवासी दत्तात्रय वाघ (वय ३४) हे दुचाकीने हातणीमार्गे चिखली-बुलढाणा रोडवरून प्रवास करीत होते. तर बुलढाणा येथील सुमित तेलरकर हे वरुड नाका येथे बँकेतून परत येत होते. हातणी गावाजवळ दोघांच्या दुचाकी समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात दोघेही जागीच ठार झाले. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात दोन तरुणांचा बळी गेल्याने मोसंबेवाडी व बुलढाणा येथे शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top