Thirty people injured in bee attack : दहाव्याच्या कार्यक्रमासाठी पैनगंगा नदीतील गेलेल्या नातेवाईकांवर आग्या मोहोळाच्या मधमाशांनी हल्ला चढविला. मधमाशा ने कडाडून चावे घेतल्याने ३० जण गंभीर जखमी झाले.
हिवरा येथील पैनगंगा नदीतीरी घटना

हिवरा आश्रम : दहाव्याच्या कार्यक्रमासाठी पैनगंगा नदीतील गेलेल्या नातेवाईकांवर आग्या मोहोळाच्या मधमाशांनी हल्ला चढविला. मधमाशा ने कडाडून चावे घेतल्याने ३० जण गंभीर जखमी झाले. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.
रायपूर येथील रहिवासी हभप विठ्ठल महाराज काळे यांचे २७ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा रविवारी दहाव्याचा कार्यक्रम होता. पैनगंगा नदीवर दाव्हवे करण्यासाठी येणाऱ्या काळे परिवारातील ३० जणांना आग्या मोहोळाच्या मधमाशांनी चावे घेऊन जखमी केले. जगन्नाथ काळे, उमेश काळे, सत्यभामा काळे, वसंता बुंधे, पंचफुला काळे, मारुती काळे, उकंडा काळे, वंदना काळे, वैभव काळे, सखुबाई काळे, अन्नपूर्णा काळे, वेदांत काळे, शारदा काळे, कुशीवर्ता काळे, रामदास वाहेकर यांच्यासह ३० जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाली असता कचऱ्याचा धूर करून काळे परिवारातील सदस्यांच्या अंगावरील मधमाशांना पळवून लावले. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी परिसरात दूर करून मधमाशांना पळवून लावले.
दरम्यान, काही जणांना हिवरा आश्रम येथील आव्हाळे हॉस्पिटल, काळे हॉस्पिटल, सुरभी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तर काही जणांना जानेफळ येथे हलविण्यात आले.


