mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मलकापूर पांग्रा परिसरात अवैध रेती उत्खनन : Illegal sand mining in Malkapur Pangra area

शेअर करा :

Illegal sand mining in Malkapur Pangra area : मलकापूर पांग्रा परिसरात अवैध रेती उत्खनन.

Illegal sand mining in Malkapur Pangra area

बुलढाणा  :  मलकापूर पांग्रा परिसरात अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचा आरोप करत अमोल साळवे यांनी तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. साळवे यांनी आरोप केला आहे की, सिंदखेड राजा तालुक्यातील नदी पत्रातील लिलाव केलेला हरास घाट बंद असतानाही अवैध रेती उत्खनन सुरू आहे.

रेती माफिया रेती घाट नियम पायदळी तुडवत आहेत आणि रात्रं दिवस अवैध रेती उत्खनन सुरू आहे. सुसाट वेगाने जाणाऱ्या अवैध टिप्परामुळे आपघाताचा घोका वाढला आहे. विना नंबर सुसाट वेगाने टिप्पर जात असून यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.

साळवे यांनी आरोप केला आहे की, रेती वाहतूक करणारे टिप्पर चालक एकाच पावतीवर दिवसभर अनेक फेऱ्या मारून रेतीची अवैध वाहतूक करत आहेत. महसूल विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे दररोज हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे.

काय आहे मागणी

– अवैध रेती उत्खनन थांबवावे
– संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी
– रेती घाटाचे नियम पाळले जावेत
– रेती वाहतूक करणाऱ्या वाहनोंवर जीपीएस प्रणाली बसवावी
– रेती उत्खनन चालू असलेल्या रेती घाटावर सी सी टीव्ही कॅमेरा बसवावा

अमोल साळवे यांनी तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे अवैध रेती उत्खनन थांबवण्याची आणि संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. साळवे यांनी अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top