mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

जिल्ह्यात इंधन टंचाई नाही.अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई : There is no fuel shortage in the district. Strict action will be taken against those spreading rumors.

शेअर करा :

There is no fuel shortage in the district. Strict action will be taken against those spreading rumors. जिल्ह्यात इंधन टंचाई नाही.अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई.

No Fuel Shortage in the District. Strict Action to Be Taken Against Those Spreading Rumors.

बुलढाणा

आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा काही असामाजिक तत्त्वांकडून पसरवल्या जात आहेत. मात्र, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

काही ठिकाणी घरगुती गॅसची बेकायदेशीर साठवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथके स्थापन केली आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागामार्फत आता अशा साठेबाजांवर आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इंधन कंपन्यांच्या (BPCL, HPCL व IOCL) माध्यमातून जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे टंचाईची कोणतीही स्थिती निर्माण झालेली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता गरजेनुसारच इंधन खरेदी करावे आणि कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर साठेबाजी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

इंधन पुरवठ्याबाबत तक्रार असल्यास किंवा कुठे साठेबाजी व काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी नैसर्गिक आपत्ती कक्ष, बुलढाणा किंवा दूरध्वनी क्रमांक: ०७२६२-२४२६८३ वर तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top