mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

उपक्रमशील शिक्षकांना मिळतोय दर महिन्याला पुरस्कार : Innovative teachers are receiving a monthly award.

शेअर करा :

Innovative teachers are receiving a monthly award.उपक्रमशील शिक्षकांना मिळतोय दर महिन्याला पुरस्कार.

Innovative teachers are receiving a monthly award. बुलढाणा :

जिल्हा परिषद व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा (बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना दर महिन्याला प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. ॲपच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पाच शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत बुलढाणा तालुकास्तरावर ‘पोस्ट ऑफ द मंथ’ म्हणून निवड झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये परवेझ शेख (जि.प. उर्दू प्राथमिक शाळा, रायपूर), माधवी देशपांडे (जि.प. हायस्कूल, देऊळघाट), अनुराधा नागरे (जि.प. प्राथमिक शाळा, सिरपूर), विद्या चवरे (जि.प. उच्च प्राथमिक शाळा, देवपूर) आणि मीनाक्षी सरदेशमुख (जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, पाडळी) या शिक्षकांना गौरविण्यात आले.

याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या एनएमएमएस शिष्यवृत्ती सराव परीक्षेत तालुक्यात उत्कृष्ट निकाल देणाऱ्या शाळांचाही गौरव करण्यात आला. यात जि.प. उच्च प्राथमिक शाळा मौंढाळा (इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा), जि.प. मराठी प्राथमिक शाळा रुईखेड मायंबा (इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षा) तसेच जि.प. मराठी प्राथमिक शाळा दाहिद बुद्रुक (एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा) या शाळांचा समावेश आहे.

हे पुरस्कार बुलढाणा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी चेतन वाडीले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पंचायत समिती बुलढाणा येथील अधिकारी व कर्मचारी तसेच आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमाचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक शेख नजीर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी सन्मानित शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यातून तालुक्यातील इतर शिक्षकांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top