mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चालक, वाहकासह आठ शेळ्या ठार : Eight goats killed along with driver and carrier

शेअर करा :

Eight goats killed along with driver and carrier : भरधाव वेगातील
ट्रक आयशरला मागून धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात  ट्रकचालकासह क्लीनर ठार झाला. तसेच आयशरमधील आठ बकऱ्यांचाही मृत्यू झाला.

Eight goats killed along with driver and carrier


ट्रक आयशरला मागून धडकल्याने भीषण अपघात : खामगावजवळ दुर्घटना
खामगाव : भरधाव वेगातील
ट्रक आयशरला मागून धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात  ट्रकचालकासह क्लीनर ठार झाला. तसेच आयशरमधील आठ बकऱ्यांचाही मृत्यू झाला. मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खामगाव तालुक्यातील वरखेड फाट्याजवळ १३ मार्चच्या पहाटे साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली.

ट्रकचालक इकबाल अली खान (वय २८) रा. अलवर, राजस्थान) व क्लीनर मोसम खान अशरु खान अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
मध्य प्रदेशातील विजयपूर येथील इन्साफ कय्यूम कुरेशी (वय ३७) हे आरजे-११-जीडी-३७९६ क्रमांकाच्या आयशरमध्ये सुरत येथून शेळ्या घेऊन नांदेड जिल्ह्यातील भोकरकडे जात होते. १३ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास खामगाव तालुक्यातील वरखेड खुर्द फाट्याजवळ पाठीमागून आरजे-३२-जीडी-२३७३ क्रमांकाचा ट्रक आयशरला धडकला. यात चालकासह क्लीनर ठार झाला.
इन्साफ कुरेशी यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी आरोपी मृत ट्रकचालक इकबाल अलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top