Body found on Samruddhi Highway : अंजनी बुद्रुक शिवारात समृद्धी महामार्गाजवळ चॅनल क्रमांक २७५ नजीक चाळीसवर्षीय व्यक्तीचा मृतदेह १३ मार्चला आढळून आला.

डोणगाव : अंजनी बुद्रुक शिवारात समृद्धी महामार्गाजवळ चॅनल क्रमांक २७५ जवळ चाळीसवर्षीय व्यक्तीचा मृतदेह १३ मार्चला आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी १२.१५ वाजेच्या सुमारास अंजनी बुद्रुक येथील पोलीस पाटील अर्जुनराव टोणपे यांना मृतदेहाबाबत माहिती, मिळाली. बांधा मजबूत, केस काळे अंगात काळया रंगाचे टी शर्ट, त्यावर पांढऱ्या रंगाच्या रेषा असलेले टीशर्ट व निळ्या रंगाचा पॅन्ट व दाढी वाढलेली असे मृताचे वर्णन आहे.
पोलीस पाटील टोणपे यांच्या तक्रारीवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीचा मृत्यू कसा झाला, याचा तपास पोलिस अंमलदार संजय घिके करीत आहेत.


