mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

येळकोट येळकोट, जय मल्हार : Yelkot Yelkot, Jai Malhar…

शेअर करा :

Yelkot Yelkot, Jai Malhar… : हनुमान जन्मोत्सवाच्या औचित्यावर १८ गडकर्‍यानी १२ बैलगाड्या ओढल्या. यावेळी येळकोट येळकोट, जय मल्हार…चा जयघोष निनादला. 

Yelkot Yelkot, Jai Malhar

१२ बैलगाड्या ओढून खंडोबा मंदिरात हनुमान जन्मोत्सव : दीडशे वर्षांची परंपरा

खामगाव : येथील महात्मा बसवेश्वर चौकातील डॉपुरातन खंडोबा मंदिरातर्फे २ एप्रिल २०२७ रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हनुमान जन्मोत्सवाच्या औचित्यावर १८ गडकर्‍यानी १२ बैलगाड्या ओढल्या. यावेळी येळकोट येळकोट, जय मल्हार…चा जयघोष निनादला.

या बैलगाड्या दोरांनी एका मागून एक याप्रमाणे बांधण्यात आल्या होत्या. गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.

विकास भोसले, सागर भोसले, दीपक भोसले, विशाल जोगदंड, नितीन जाधव, उमेश जाधव, सचिन शिंदे, संभाजी तासतोडे, सोहम माटकर, रामा उन्हाळे, शंकर गुजरीवार, सोनू बावस्कर, शिवशंकर मच्छिंद्र, अक्षय सातपुते, श्याम पवार, ओम फरांडे,लकी बहिरे, माऊली रेडे या गडकर्‍याचे पूजन करून त्यांना भंडारा (हळद) लावण्यात आला. भक्ती भावाने साजरा करण्यात येणारा १२ गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात खामगाव शहरासह जिल्हाभरातील हजारो खंडोबा भक्त सहभागी झाले होते. बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी मार्गातील रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातच हा उत्सव पार पडत असल्याने या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील बसवेश्वर चौक, आठवडी बाजार, भुसावळ चौक व कमलसिंह गौतम चौक येथून परत गडकर्‍यानी १२ गाड्या ओढत खंडोबा मंदिरात पोहोचले.

पुरातन काळापासून चालत आलेली ही प्रथा यापुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे खंडोबा मंदिराचे सर्वेसर्वा रवी भोसले यांनी सांगितले.

खंडोबा मंदिरात ३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता हजारो भक्तांच्या उपस्थितीत खंडोबा व माता बाणाई यांचा लग्न सोहळा पार पडला. या ठिकाणी शहरासह जिल्हाभरातील खंडोबाभक्त दर्शनासाठी आले होते. हनुमान जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाची सांगता ३ एप्रिल रोजी जागरण गोंधळ व साखळदंड तोडून करण्यात आली. हनुमान जयंतीच्या दिवशी २ एप्रिल रोजी खंडोबा मंदिरातर्फे यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणीf प्रसाद, हार, फुले, नारळ, लहान मुलांची खेळणी आदींची दुकाने थाटण्यात आली होती. या उत्सवादरम्यान खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top