mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

शिक्षणानेच समाजपरिवर्तन शक्य जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे : Social Transformation is Possible Only Through Education: District Collector Dr. Pravinkumar Deore

शेअर करा :

Social Transformation is Possible Only Through Education: District Collector Dr. Pravinkumar Deore : शिक्षणानेच समाजपरिवर्तन शक्य: डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे ‘सामाजिक समता सप्ताहा’त आवाहन

Social Transformation is Possible Only Through Education: District Collector Dr. Pravinkumar Deore
शिक्षणानेच समाजपरिवर्तन शक्य-डॉ. प्रवीणकुमार देवरा

बुलढाणा, दि. १४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाच्या मूलमंत्राचे स्मरण करत, आजच्या तरुण पिढीने उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले. सामाजिक न्याय भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सामाजिक समता सप्ताहा’च्या उत्साहात समारोपप्रसंगी ते बोलत होते. शिक्षणानेच समाजपरिवर्तन शक्य आहे, हा विचार त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केला.

 

या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, सहायक आयुक्त मनोज मेरत, महिला व बाल विकास अधिकारी प्रमोद इंडोले यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. देवरे यांनी आपल्या भाषणात, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात तळागाळातील समाजात आत्मविश्वास निर्माण करणे हे किती कठीण कार्य होते, याची आठवण करून दिली. हे कार्य महापुरुषांच्या अथक प्रयत्नांमुळेच साध्य झाले, असे ते म्हणाले. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून आणि जगातील उपलब्ध ज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

 

डॉ. देवरे यांनी उच्च पदस्थ व्यक्ती आणि सुशिक्षित तरुणांना समाजाकडून मिळालेल्या संधींची परतफेड करण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले. नवीन पिढीने तंत्रज्ञान आणि पुस्तकांच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करून भारताच्या जडणघडणीत सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या वैयक्तिक प्रवासाचा दाखला देत, सातपुड्याच्या कुशीतील एका छोट्याशा खेड्यातून येऊन जर प्रगती साधता येते, तर आजच्या सोयीसुविधांच्या काळात विद्यार्थी नक्कीच मोठे यश संपादन करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Social Transformation is Possible Only Through Education: District Collector Dr. Pravinkumar Deore

कार्यक्रमाची सुरुवात सहायक आयुक्त मनोज मेरत यांच्या प्रास्ताविकाने झाली. याप्रसंगी शाहीर डी. आर. इंगळे यांनी आपल्या पहाडी आवाजात शाहिरी कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वरिष्ठ लिपिक संदीप कपले आणि सहायक शिक्षिका स्नेहल काळवाघे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि इतर मागास व बहुजन कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गीता केदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top