mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली : Tributes paid to Dr. Babasaheb Ambedkar at the Buldhana District Collector’s Office.

शेअर करा :

Tributes paid to Dr. Babasaheb Ambedkar at the Buldhana District Collector’s Office. : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली

Tributes paid to Dr. Babasaheb Ambedkar at the Buldhana District Collector's Office.

बुलढाणा, दि. १४: भारतीय संविधानाचे महान शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना वंदन केले.

 

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुरेश खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, सुरेश थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विठ्ठल कुमरे, वृषाली केसकर, जिल्हा नाझर गजानन मोतेकर, नायब तहसीलदार संजय बंगाळे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदराने अभिवादन केले. या कार्यक्रमातून डॉ. आंबेडकरांच्या कार्याची आणि विचारांची महती अधोरेखित झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top