Girl dies after getting stuck in cutter machine : तेरावर्षीय मुलीचा मल्चर मशीन (कडबा कटर) मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला.
मध्यप्रदेशातील मजूर कुटुंबीयांवर आघात

बुलढाणा : पोटाची खळगी भरण्यासाठी विदर्भात आलेल्या मध्यप्रदेशातील एका कुटुंबावर सोमवारी दुःखाचे आभाळ कोसळले. तेरावर्षीय मुलीचा मल्चर मशीन (कडबा कटर) मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. चिखली तालुक्यातील भरोसा शिवारात दुपारी ही घटना घडली.
पूजा रुमाल सिंग गौतम (वय १३) असे मृत दुर्दैवी मुलीचे नाव आहे. मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील नापानगर तालुक्यात येणाऱ्या भूरपाली येथील मजूर गौतम कुटुंब मजुरी करण्यासाठी आले आहे. सध्या भरोसा येथे राहून मजुरी करते. राजू सखाराम निराले (वय २८) हे आपल्या बहिणीसह व इतर मजुरांसोबत अशोक लिंबाजी थोटे यांच्या शेतात मका तोडण्याचे काम करत होते. १२ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास सर्व मजूर पाणी पिण्यासाठी गेले असता पूजा ही दिसून आली नाही. शोध घेतला असता ती शेतात ट्रॅक्टरच्या मल्चर मशीनमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. ट्रॅक्टर बंद करून पूजाला बाहेर काढण्यात आले असता तिचा मृत्यू झाला होता.
राजू इरादे यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


